+91-020-25656577

"राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट ) प्रकल्प " अंमलबजावणी आराखडा तयार करण्याकरिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची प्रलकप समन्वय समिती गठीत केली आहे.

प्रकल्प समन्वय समिती

  • प्रकल्प समन्वय समिती (पीसीसी)मध्ये प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प- अध्यक्ष, आयुक्त - कृषि- सदस्य, प्रकल्प संचालक - महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प- कार्यवाहक, प्रकल्प संचालक- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान- सदस्य, पणन संचालक- सदस्य, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी-ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन- सदस्य यांचा समावेश आहे.

प्रकल्प आराखडा समिती

  • प्रकल्प आराखडा समिती (पीपीसी) मध्ये प्रकल्प संचालक - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून प्रकल्प संचालक - महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास, व्यवस्थापकीय संचालक- महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, नोडल अधिकारी-महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास, नोडल अधिकारी-पशुसंवर्धन विभाग, मिशन व्यवस्थापक - महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन आणि मिशन व्यवस्थापक-एमएसआरएलएम यांचा समावेश आहे.